विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nida Khan टीसीएसमधील निदा खान प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.Nida Khan
संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या प्रकरणात समोर येत असलेली माहिती अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. “निदा खानला तिथे कोणी पाठवले, ती मुंब्र्यात का गेली, तिचे एमआयएमशी काय संबंध होते, या सर्व गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरही गंभीर आरोप करत, “इम्तियाज जलील नाशिकला जाऊन भेटले होते. नगरसेवकाला घर देण्यासाठी दबाव आणण्यात आला,” असा दावा केला.Nida Khan
शिरसाट यांनी पुढे सांगितले की, “जिचा संभाजीनगरशी काही संबंध नाही, ती महिला पुन्हा तिथे कशी आली आणि तिथे राहत कशी होती, हा तपासाचा विषय आहे. स्थानिक नगरसेवकाला काहीच माहिती नव्हती, असे होऊ शकत नाही.”
या प्रकरणाला राजकीय स्वरूप देऊ नये, असे आवाहन करताना त्यांनी हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे म्हटले. “धर्मांतर, लव्ह जिहाद आणि तरुणांना नशेच्या आहारी नेणे, अशा तीन टप्प्यांमध्ये ही यंत्रणा काम करत असल्याचा संशय आहे. ही साखळी राज्यभर फिरत असल्याची माहिती समोर येत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“कॉर्पोरेट जिहाद हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. टीसीएसमधील प्रकरण हे केवळ निदा खानपुरते मर्यादित नाही. यामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी एसआयटी चौकशी आवश्यक आहे,” असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
एमआयएमचे नेते असूयांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी, “एमआयएमचे काही नेते कुणाचे तरी मोहरे बनून काम करत आहेत,” असा आरोप केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याचे सांगत, “आवश्यकतेनुसार आणखी अटक केली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Shirsat demands SIT probe into TCS case, alleges larger racket behind Nida Khan matter
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा