विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister राज्यातील काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषतः ग्रामीण आणि कृषीप्रधान भागांत डिझेलची मागणी अनपेक्षितरीत्या वाढल्याने इंधन साठेबाजीचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तरी गडबड असल्याचा संशय व्यक्त करत प्रशासनाला तातडीच्या सूचना देत शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत इंधनटंचाईचा फटका बसू नये, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.Chief Minister
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्य प्रशासनाकडे दरवर्षी इंधनाच्या वापराचा आणि मागणीचा ठराविक अंदाज असतो. मात्र यंदा काही जिल्ह्यांत अचानक २० ते ३० टक्क्यांनी मागणी वाढल्याने परिस्थिती संशयास्पद वाटत आहे. “ही वाढ नैसर्गिक नसून काही ठिकाणी साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो,” असे संकेत त्यांनी दिले.Chief Minister
विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागात इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतीकामांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पुरवठा विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काही जिल्ह्यांमध्ये डिझेल वितरणासाठी नवीन नियंत्रण यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. वाहनांचे आरसी बुक तपासूनच डिझेल देण्याची पद्धत काही पेट्रोल पंपांवर लागू करण्यात आली आहे. शेतकरी आणि प्रत्यक्ष गरज असलेल्या वाहनधारकांनाच इंधन मिळावे, यासाठी प्रशासनाने हा उपाय सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल सहज उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने तेल कंपन्यांशीही संपर्क वाढवला आहे. पुरवठा साखळीत कुठे अडथळे निर्माण होत आहेत का, याची तपासणी सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त टँकर पाठवण्याबाबत हालचाली सुरू आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करत असेल, तर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी.” तसेच काळाबाजार, अतिरिक्त साठा आणि संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांत पावसाळ्यापूर्वी शेतीकामांना वेग आला असताना इंधनटंचाईची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गातही चिंता व्यक्त होत आहे. मात्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे स्पष्ट केले आहे.
Sudden 20-30% surge in petrol and diesel demand; Chief Minister suspects foul play
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश