Sushma Andhare : माफी मागणार नाही, शिक्षा दिल्यास भोगण्यास तयार” हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंची भूमिका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sushma Andhare  स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विडंबनात्मक गाण्याला पाठिंबा दिल्याप्रकरणी हक्कभंगाच्या सुनावणीला सामोऱ्या गेलेल्या शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणतेही विधान केले नसल्याचे स्पष्ट करत माफी मागण्यास नकार दिला. समिती जी शिक्षा देईल ती भोगण्यास तयार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.Sushma Andhare

विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावावर समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. यावेळी समितीचे सदस्य अनिल परब, प्रवीण दरेकर आणि मनिषा कायंदे उपस्थित होते.Sushma Andhare



सुनावणीदरम्यान अंधारे यांना त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्ट आणि वक्तव्याबाबत स्पष्टीकरण विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “माझे वक्तव्य हे हॅबिटॅट स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडीविरोधात होते. त्या घटनेत सहभागी असलेले कोणीही विधिमंडळ सदस्य नव्हते. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,” असे

सांगितले.तसेच, “मी कोणतेही असंसदीय शब्द वापरलेले नाहीत. त्यामुळे माफी मागणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. समितीने ही कारवाई राजकीय कारणातून होत असल्याचे वाटते का, असा प्रश्न विचारल्यानंतर अंधारे यांनी होकार दर्शवत, “ईडी किंवा सीबीआयसारख्या यंत्रणांमधून मला अडकवता येत नसल्यामुळे राजकीय आकसातून ही कारवाई होत आहे,” असा आरोप केला.

दरम्यान, सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी अंधारे यांच्यावर टीका करत, “त्यांनी २२ ते २३ प्रश्नांना थेट उत्तरे दिली नाहीत. केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली,” असा दावा केला. पुढील बैठकीत समिती या प्रकरणाचा पुनर्विचार करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“Won’t apologise, ready to face punishment”: Sushma Andhare’s stand before breach of privilege panel

महत्वाच्या बातम्या