विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Rathod मंत्रालयात राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून ८० हजार रुपयांची हातसफाई केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याऐवजी मंत्रालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.Sanjay Rathod
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री राठोड दालनात आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. थेट मंत्र्यांच्याच दालनात दुपारच्या सुमारास रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यालयात एकच धावपळ उडाली. मंत्री कार्यालयात ठेवलेली रोकड अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी तसेच नियमित ये-जा करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे.Sanjay Rathod
मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवेश नोंदी आणि संशयित हालचालींची बारकाईने तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालय परिसरात ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक रोख रक्कम नेण्यावर निर्बंध असताना ८० हजार रुपये कार्यालयात कसे आणले गेले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही रोकड नेमकी कोणाची होती, ती कार्यालयात कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र मंत्रालय प्रशासनाने अंतर्गत पातळीवर चौकशीची चक्रे वेगाने फिरवली असून काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे समजते. मात्र, मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेवरही या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Theft inside Mantralaya’: ₹80,000 stolen from Minister Sanjay Rathod’s office
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश