विशेष प्रतिनिधी
मुंबई : Deonar पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंडीतील देवनार परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.Deonar
पोलिसांच्या माहितीनुसार, हे आरोपी घटना घडल्यानंतर पश्चिम बंगालमधून पळून मुंबईत आले होते आणि बनावट ओळख लपवून राहत होते. सदर प्रकरण 7 मे रोजी हावडा जिल्ह्यातील शिबपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले होते. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्रास्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.Deonar
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिसरात निर्माण झालेल्या तणावादरम्यान गोळीबार आणि देशी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोपींवर आरोप आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा वापर करून समन्वित हल्ले केले होते. या हिंसाचारामुळे शिबपूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 ला बुधवारी गुप्त माहिती मिळाली की, मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार देवनारमधील एका SRA इमारतीत लपून बसले आहेत. त्यानुसार तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून तिघांना अटक केली. अटक आरोपींची नावे शमीम अहमद अब्दुल रशीद (40), जमील अख्तर अली (43) आणि आफताब अन्वर खुर्शीद अन्वर (44) अशी असून तिघेही पश्चिम बंगालमधील शिबपूर आणि हावडा परिसरातील रहिवासी आहेत.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दंगल, बेकायदेशीर जमाव, गुन्हेगारी कट, खुनाचा प्रयत्न, शस्त्रांचा वापर आणि स्फोटकांशी संबंधित अनेक गुन्ह्यांत ते वॉन्टेड होते. शिबपूर पोलीस ठाण्याचे पथक मुंबईत दाखल झाले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
Three accused in West Bengal bomb blast case arrested from Mumbai’s Deonar
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा