Nasrapur : अवघ्या दीड तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या, नसरापूर येथील अत्याचारानंतर नागरिकांचा संताप

विशेष प्रतिनिधी

पुणे : Nasrapur नसरापूर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या दीड तासात आरोपीला अटक केली, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.Nasrapur

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला अल्पावधीत ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.Nasrapur



या अमानुष घटनेनंतर परिसरात तीव्र भावना व्यक्त होत असून काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही दिसून आले. पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे तपास जलदगतीने पूर्ण होण्यास मदत झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

या प्रकरणात तातडीने दोषारोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यावर पोलिसांचा भर आहे. आरोपीवर यापूर्वीही १९९८ आणि २०१५ मध्ये गुन्हे दाखल झाले होते, मात्र तो त्यातून मुक्त झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी अशा क्रूर गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्याची विनंती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना केली आहे.
त्यांनी या गुन्हेगाराला “फाशी” च्या शिक्षेसोबतच “थर्ड-डिग्री” आणि “फोर्थ-डिग्री” सारखी कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

श्री. अभ्यंकर यांनी वकील संघटनेलाही या गुन्हेगाराचा पक्ष न घेण्याची विनंती केली आहे.

अशी कडक शिक्षा द्यावी की ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक उदाहरण ठरावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Accused nabbed within 90 minutes after Nasrapur assault, public outrage erupts

महत्वाच्या बातम्या