विशेष प्रतिनिधी
पुणे : “मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे कवडीचेही ज्ञान नसलेल्या माणसाच्या हातात गेलेला पोरखेळ आहे. सरकारने त्यांच्यासाठी नेहमीच ‘रेड कार्पेट’ घातले असून, त्यांच्या दबावाखाली येऊन काढलेले सरकारी नोटिफिकेशन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मनोज जरांगे यांची मागणी कायद्याच्या कसोटीवर कधीही टिकणार नाही,” अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
जरांगे पाटील यांच्या नवव्या उपोषणावर बोलताना हाके यांनी त्यांना उपरोधिक सदिच्छा दिल्या. ते म्हणाले, “याआधी ८ वेळा उपोषण करून झाले आहे, आता हे नववे उपोषण सुरू आहे. पाच पिढ्यांचे नुकसान झाल्याचा दावा जरांगे करत आहेत, पण मग यामुळे फायदा नेमका कुणाचा झाला? मुळात मराठा समाजातील गरिबीला ओबीसी आरक्षण कसे काय जबाबदार असू शकते? बजेटमध्ये ओबीसींसाठी किती निधी येतो, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. पुढाऱ्यांनी आणि सहकार महर्षींनीच संपत्तीचे केंद्रीकरण करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखाने कुणामुळे बुडाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे.”
शासनाच्या धोरणांवर प्रहार करताना हाके म्हणाले, “सरकारने जरांगे यांचे अवाजवी लाड पुरवले आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्री केवळ त्यांनाच भेटायला जातात, पण त्यांना ओबीसी समाजाचे दुःख आणि भूमिका का कळत नाही? सरकार कोणताही निकष न लावता बेकायदेशीरपणे प्रमाणपत्रे वाटत असून सर्व कुणबी प्रमाणपत्रे बनावट आहेत. या आंदोलनामुळे ओबीसींचे मोठे नुकसान झाले असून आमचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.”
लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः आता उपोषणाला बसणार नसून थेट मैदानात उतरून लढा देणार आहेत. त्यासाठी राज्यभर जनजागृती सभांचा धडाका सुरूच राहील. “जरांगे हे नक्कीच लढणारे गडी आहेत, पण त्यांची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. त्यांचे ज्ञान कमी आहे, पण सध्या त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये. जरांगे दादा, तुम्ही गरजवंतांचा लढा उभा केलात, पण त्याचा फायदा नेमका कोणी घेतला याचा विचार करा. तुमचे मन मोठे करा आणि सर्व समाजाच्या प्रश्नांवर एकत्र या, आम्ही तुमच्यासोबत उभे राहायला तयार आहोत,” असे आवाहनही शेवटी हाके यांनी केले.
“If OBC reservation is touched, you will have to face us,” warns OBC leader Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश