विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आज पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये भेट दिली. 28 जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार यांच्या अपघाता अगोदर भोंदू अशोक खरात च्या सल्ल्यानुसार बारामती मधील एका नेत्याने अजित पवार यांच्या घराबाहेर आणि शेतात पूजा केली होती,असा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो सीआयडीने हाती घेतला नव्हता, तो त्यांनी तपासावा अशी मागणी करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे.अजितदादांच्या काटेवाडीत असलेल्या घराजवळ शेतात एक विहीर आहे.या हे विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात झाडाला 28 तारखेपूर्वी बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती.
रोहित पवारांनी सांगितले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे. त्या माहितीनुसार बारामती मधील एक छोटा नेता आहे, जो मागील अनेकदिवसांपासून भोंदू अशोक खरातच्या संपर्कात होता.सोबतच अजित पवारांच्या पक्षातील जे नेते खरतच्या संपर्कात होते, त्याच लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे. तसेच अजित दादांच्या काटेवाडी मधील घराची आणि सहयोग येथे असलेल्या घराची पूजा ही या छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली, असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आम्ही काळा जादूवर विश्वास ठेवत नाही. आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. मात्र या मागचा हेतू काय होता. तसेच दादांच्या काटेवाडी येथील घर, सहयोगमधील घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घरांसमोर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या?भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यामध्ये २७,२८ आणि २९ जानेवारी रोजी उलाढाल का वाढली,असा प्रश्न देखील रोहित पवारांनी उपस्थित केला.
Increase in worship outside Ajit Pawar’s house, bank transactions; Rohit Pawar raises serious questions
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन