पत्रकाराकडून महिलेचा विनयभंग प्रकरण; पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

पुणे : शहरातील एका पत्रकाराकडून महिलेचा विनयभंग झाल्याच्या कथित प्रकरणाने पुण्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला आहे. या संवेदनशील घटनेवर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट भूमिका मांडत, कोणालाही कायद्यापेक्षा वर मानले जाणार नाही आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

या प्रकरणात संबंधित महिलेने पत्रकाराविरोधात विनयभंगाचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पत्रकाराने महिलेबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.मात्र या प्रकरणात शहरातील इतर पत्रकारांचा समावेश असल्याचे पत्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी पुणे पोलिस आयुक्तानं दिले होते तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिस आयुक्तानं लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या,या संदर्भात आयुक्त अमितेश कुमार यांनी भूमिका मांडली आहे.



अमितेश कुमार म्हणाले की,आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासात सिद्ध झालं आहे की,संबंधित गुन्ह्यातील व्यक्ती बुधवार पेठेतील लॉज वर गेला होता,मात्र ज्यावेळी लॉज मधील मॅनेजर आणि इतर व्यक्तींनी संबंधित गुन्हेगार पत्रकाराला पकडल्यानंतर आम्ही या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करिता आलेलो आहोत असे सांगण्यात आले. मात्र लॉज वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्यानंतर त्या ठिकाणी आरोपींशिवाय इतर कोणीही आढळून आले नाही.संबंधित गुन्ह्यातील आरोपी पत्रकार सध्या फरार आहे.

रूपाली ठोंबरेंच्या पत्रावर अमितेश कुमार म्हणाले की,पोलिसांना मिळालेल्या पत्रात रूपाली पाटील यांनी काही पत्रकारांची नावे नमूद करून हे षडयंत्र असल्याचे सांगितले होते,मात्र नमूद केलेल्या माहितीनुसार कोणतेही पुरावे रूपाली ठोंबरे यांनी पोलिसांना दिले नाहीत.त्यासंदर्भात अधिक तपास केला असता त्यात काहीही निष्पन्न झाले नाही.

तपासात राजकीय दबाव नाही..

अमितेश कुमार यांनी सांगितले की,आरोपींना वाचवण्यासाठी आणि गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मला कोणाचाही फोन आलेला नाही.राजकीय लोकप्रतिनिधींचा दबाव या प्रकरणात असल्याचे आरोप निष्फळ आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, संबंधित ठिकाणचे CCTV फुटेज, आणि इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास केला जात आहे.तसेच फरार पत्रकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pune journalist molests woman; Police Commissioner Amitesh Kumar’s clear stand

 

महत्वाच्या बातम्या