Rajaram bridge : राजाराम पुल विस्तारास मंजुरी; सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rajaram bridge सिंहगड रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने राजाराम पुलाच्या विस्ताराला मंजुरी दिली असून, या प्रकल्पामुळे पुलाची क्षमता दुप्पट होण्याची होणार आहे. प्रस्तावानुसार पुलाची रुंदी वाढवून तो सहा पदरी करण्यात येणार आहे.Rajaram bridge

महापालिका प्रशासन सध्या या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत असून, प्रस्तावाचे तांत्रिक आराखडे आणि व्यवहार्यता तपासली जाणार आहे. शहरातील सिंहगड रस्ता हा सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. धायरी, माणिकबाग आणि आनंदनगर या भागांतील नागरिकांसाठी राजाराम पूल हा शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, सध्या या पुलावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी डी.पी. रस्त्यावरील पंडित फार्मपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.Rajaram bridge



महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजरे यांनी सांगितले की, सध्या पुलाची रुंदी सुमारे १५ मीटर असून, परिसरातील झपाट्याने झालेल्या नागरीकरणामुळे वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी पुलाची रुंदी आणखी १० मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाचा विस्तार सध्या नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या बाजूच्या जागेवर करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत विद्यमान पुलाच्या शेजारी समांतर नवीन पूल उभारण्यात येणार असून, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक मार्ग उपलब्ध होणार आहेत. तसेच जुन्या पुलाचे मजबुतीकरण व दुरुस्तीही केली जाणार आहे, जेणेकरून भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा भार तो समर्थपणे पेलू शकेल.

या विस्तारानंतर राजाराम पूल सहा पदरी होणार असून, वाहनांच्या गतीत वाढ होऊन सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Rajaram bridge expansion approved; relief from traffic congestion on Sinhagad Road

महत्वाच्या बातम्या