Vande Bharat : पुण्यात वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात: १५ क्रमांकाचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाची धावपळ!

विशेष प्रतिनिधी

पुणे: Vande Bharat  मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला आज पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अपघात झाला. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे जात असताना ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.Vande Bharat

नेमकी घटना काय आणि कारण काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबईहून सोलापूरला जात होती. संध्याकाळी 7 च्या सुमारास गाडी पुणे जंक्शनच्या मुख्य लाईनवरून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ कडे वळत असताना हा बिघाड झाला.Vande Bharat



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचे इंजिन आणि पुढचे डबे सुरक्षितपणे पुढे गेले, मात्र १५ क्रमांकाच्या डब्याने ट्रॅक बदलला नाही, ज्यामुळे तो डबा रुळावरून खाली उतरला.मध्य रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष समिती स्थापन केली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ‘विशेष ट्रेन’

या अपघातामुळे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. प्रवाशांची अडचण ओळखून रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत.अडकलेल्या प्रवाशांसाठी नवीन पर्यायी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर एकत्र येण्याची सूचना देण्यात आली असून लवकरच ही नवीन गाडी सोलापूरकडे रवाना होईल.तर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वगळता इतर सर्व प्लॅटफॉर्मवरील रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे.

कुलींनी जपली माणुसकी

या कठीण प्रसंगात पुणे स्थानकावरील कुलींनी माणुसकीचे दर्शन घडवले. अपघात झाल्यानंतर प्रवाशांना आपले जड सामान घेऊन रुळांवरून चालत बाहेर पडावे लागत होते. अशा वेळी नेहमी पैसे घेऊन काम करणाऱ्या कुलींनी कोणतेही शुल्क न घेता प्रवाशांचे सामान उचलून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत केली.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील गाड्यांचे मार्ग सध्या इतर प्लॅटफॉर्मवर वळवण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या किंवा येणाऱ्या काही गाड्यांना थोडा उशीर होण्याची शक्यता रेल्वे विभागाने वर्तवली आहे.

Vande Bharat Express accident in Pune: No. 15 coach derails; Railway administration rush for the convenience of passengers!

महत्वाच्या बातम्या