विधानपरिषदेसाठी भाजपाची संभाव्य यादी आली! कोणत्या नावांना मिळणार संधी…

विशेष प्रतिनिधी

पुणे: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विधानपरिषदेच्या १० जागांसाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.महत्वाच म्हणजे भाजपाला पाच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पक्षात चर्चांना उधाण आले आहे.प्रादेशिक संतुलन साधत संघटन बळकटीसाठी भारतीय जनता पक्षच्या ५ संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली आहेत.

संभाव्य यादीत प्रथम चर्चेत असलेले नाव म्हणजे अतुल काळसेकर.कोकणातील भाजपाची राजकीय पकड अजून मजबूत करण्यासाठी त्यांचा नावाचा विचार केला जाऊ शकतो.त्यामुळे काळसेकर यांचे नाव पक्षाच्या अंतिम यादीत स्थान मिळू शकते,असा अंदाज व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातून भाजपाकडून महिला नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता आहे.त्या अनुषंगाने प्रज्ञा सातव यांचे नाव आघाडीवर आहे.पक्षातील नव्या चेहऱ्याला पुढे आणण्याची रणनीती भाजपाकडून वापरण्यात आली तर, सातव यांना विधान परिषदेचे उमेदवारी मिळू शकते.



दरम्यान,मराठवाड्यातीलच भाजपाचे निष्ठावान आणि संघटनात्मक पातळीवर काम करणारे म्हणून ओळख असलेल्या संजय केणेकर यांचा नावाची देखील चर्चा ऐकायला मिळत आहे.दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा दृष्टीने संजय केणेकर यांचे नाव महत्वाचे मानले जात आहे.

तर मुंबई आणि ठाणे पट्ट्यात भाजपाचा विस्तार प्रभावी करण्यासाठी माधवी नाईक यांचे नाव देखील पुढे येत आहे.ठाणे,कल्याण – डोंबिवली आणि नवी मुंबई या पट्ट्यातील वाढते राजकीय महत्व लक्षात घेता या भागाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व देण्याचा भाजपाचा विचार असू शकतो.महिला नेतृत्व, स्थानिक संपर्क या बाबींचा विचार करता माधवी नाईक यांचे नाव संभाव्य यादीत महत्वाचे मानले जात आहे.

तर दुसरीकडे विदर्भात भाजपाकडून स्थानिक नेतृत्वाला बळ देण्यासाठी राजू पोतदार यांचा नावाची चर्चा चालू आहे.भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात संघटन अधिक मजबूत ठेवणे हा पक्षाचा उद्देश असू शकतो.त्यामुळे विदर्भातून राजू पोतदार यांचे नाव गांभीर्याने विचारत घेतले जात असल्याचे बोलेल जात आहे.

भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा कौल नेमका कुणाला मिळतो, पक्षातील जुन्या निष्ठावंतांना न्याय मिळतो की नवीन चेहऱ्यांना संधी मिळते,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

BJP’s probable list for the Legislative Council has arrived! Which names will get a chance…

 

महत्वाच्या बातम्या