विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Quran Hafiz Ehsan सध्या सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये एहसान नावाच्या एका व्यक्तीने इस्लाममधील गुन्हेगारी संकल्पनांबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. कुराणचे संपूर्ण पठण केलेल्या आणि ‘हाफिज’ ही उपाधी मिळवलेल्या एहसानने ‘द राष्ट्रनीती’ या माध्यमाशी संवाद साधताना म्हटलं आहे की, “इस्लामनुसार मूर्तीपूजा (शिर्क) हा बलात्कारापेक्षाही मोठा गुन्हा आहे.”Quran Hafiz Ehsan
ही मुलाखत १६ एप्रिल रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाली. मुलाखतीदरम्यान एहसानने प्रश्न उपस्थित केला – “जर एका बाजूला बलात्कार होत असेल आणि दुसऱ्या बाजूला मूर्तीपूजा सुरू असेल, तर इस्लामनुसार मोठा गुन्हा कोणता?” यावर त्याचं उत्तर होतं – “मूर्तीपूजा, कारण अल्लाह म्हणतो की तो सर्व पापं माफ करेल, पण शिर्क (म्हणजेच मूर्तीपूजा) कधीच माफ करणार नाही.”
एहसानने हा दावा करत इस्लामिक मतांच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असून, स्वतः आता ‘एक्स-मुस्लिम’ असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या विधानामुळे समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्याचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
हा प्रकार धार्मिक भावना दुखावणारा आणि द्वेष पसरवणारा ठरू शकतो, अशी शक्यता असून प्रशासन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून याची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेकांकडून या विधानाच्या विरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.
According to Islam, idol worship is a bigger crime than rape, Quran Hafiz Ehsan’s controversial statement
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत