विशेष प्रतिनिधी
साेलापूर : राज्यात हाेणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आज रात्री दहा वाजता संपत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी झंझावती दाैरे केले. आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी गावाेगावी फिरत आहेत. मात्र, साेलापूर जिल्ह्यातील एका सभेत त्यांनी पक्षाच्या अधिकृत धनुष्य बाण चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करू नका असे आवाहन केले.Eknath Shinde
मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणाच्या निवडणुकीवरून सध्या शिवसेनेत गोंधळ उडाला आहे. येथे शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रगती दगडे रिंगणात आहेत. युती असूनही एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने प्रचाराच्या सुरुवातीलाच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
कालच्या सभेत भाषण सुरू असताना स्थानिक नेते संतोष पाटील यांनी एकनाथ शिंदेंना एक चिठ्ठी दिली. ती वाचताच शिंदेंनी तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा प्रचार केल्याचे दिसून आले. “शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, आघाडीचा धर्म पाळा,” असे थेट आवाहन त्यांनी केले. Eknath Shinde
“नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या अधिकृत उमेदवार नाहीत. येथे महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे.” असे शिंदे म्हणाले. आपल्याच पक्षाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन पक्षप्रमुखांनी केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
या गोंधळावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ज्योत्स्ना पाटील या मुळच्या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या आहेत. शिवसेनेने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या पाळल्या नाहीत. परिणामी, आघाडीचा धर्म राखण्यासाठी शिंदेंनी प्रगती दगडे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. Eknath Shinde
Don’t vote for Dhanushya Bana, Eknath Shinde’s public appeal in a public meeting
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक