राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार

विशेष प्रतिनिधी

मुंबई -: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज विधिवतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. Sunetra Pawar

या ऐतिहासिक प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. Sunetra Pawar

कार्यभार स्वीकारताना उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



सुनेत्रा पवार यांचा हा प्रवास राज्यातील महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकासात तो नवा अध्याय जोडणारा ठरेल, असे मत याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. Sunetra Pawar

सुनेत्रा पवार यांनी आज प्रदेश कार्यालयात भेट देऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदींसह पक्षाचे नेते, सर्व मंत्री,आमदार उपस्थित होते. Sunetra Pawar

Sunetra Pawar Takes Charge As Maharashtra’s First Woman Deputy Chief Minister

महत्वाच्या बातम्या