काॅंग्रस निवडणूक लढविण्यासाठी पुढे पण… संजय राऊत यांचा टाेला

विशेष प्रतिनिधी

जळगाव : राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत. ते कुठे आहेत? असा टाेला राऊत यांनी लगावला आहे. Sanjay Raut

जळगाव येथे काॅंग्रेसच्या भूमिकेवर जाेरदार हल्लाबाेल करताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे; त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे. या दोन्ही जागांसंदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून निर्णय घेतील आणि तो घ्यावा लागेल. राहुरीमध्ये लढण्याची आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण भाजपला मदत होईल, अशी भूमिका कुणी घेऊ नये, असा महाविकास आघाडीचा निर्णय आहे.

राऊत म्हणाले की,राहुरी आणि बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक होत आहे. आमचा प्रयत्न आहे की, या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये या आधीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने लढवली होती. आता मला नक्की माहिती नाही पण, त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अधिकार आहे. काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो… आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण कुठे आहोत. ते कुठे आहेत? ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे; त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार आहे…

त्यामुळे राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद असल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांना बसून निर्णय घ्यावा लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक धर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही. पण त्या ठिकाणी जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये.

देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे, पोलिसांनी योग्य तपास केला आहे, संदीप कर्णिक यांच्यामुळे खरात लंगडतांना दिसला, गृहखाते काय तपास करते, त्यात कोणाला सोडले, अडकवले यावर बोलता येईल, एसआयटी सुद्धा उत्तम काम करत आहे. या प्रकरणात सुषमाताई आणि रोहित पवार यांच्यामध्ये असलेल्या माहितीमध्ये तफावत आहे, माझ्याजवळ अधिक माहिती नसल्याने मी याबाबत बोलू इच्छित नाही, आसाराम बापू आज मुक्त आहेत, राम रहीम मुक्त आहे, निवडणुकीसाठी त्याला बाहेर आणले गेले होते, अशा सरकारकडून काय अपेक्षा करणार, असे राऊत म्हणाले.

Congress Pushes Ahead with Poll Plans, But Sanjay Raut Signals Strategic Twist

महत्वाच्या बातम्या