विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Rahuri Bypoll राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतच अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असतानाच काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात उमेदवारीवरून तणाव वाढला आहे.Rahuri Bypoll
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले की, राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे. त्यांनी दावा केला की, काँग्रेस केवळ उमेदवार देणार नाही, तर तो विजयीही होईल. दुसरीकडे, ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या निर्णयाची पूर्वकल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचेही सांगितले.Rahuri Bypoll
विशेष म्हणजे, खेवरे यांनी थोरात यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावर थोरात यांनी हा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे संकेत दिले, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, भाजपने या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत असताना, महाविकास आघाडीत मात्र उमेदवार ठरवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने देखील स्वतंत्र भूमिका घेतल्याचे दिसत आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली, तरी ते पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी अलीकडेच मतदारसंघात यात्रा काढली, मात्र त्यात राष्ट्रवादीचे चिन्ह कुठेही दिसले नाही. तसेच ते भगवे वस्त्र परिधान करून जनसंपर्क करत असल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने काँग्रेसला वरिष्ठ पातळीवर या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय कळवला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे गटातच उमेदवारीवरून संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. ६) असल्याने महाविकास आघाडीसमोर वेळेचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. शेवटच्या टप्प्यात उमेदवार निश्चित करताना आघाडीत फूट पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
MVA Rift Deepens Over Rahuri Bypoll Candidate, Congress and Thackeray Faction at Odds
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर