रील स्टार सोनाली हिंगे, पीएसआयसह तिघांवर ७ लाख खंडणी प्रकरणात गुन्हा, ‘पॉक्सो’ची धमकी देत प्राचार्याला ब्लॅकमेल

विशेष प्रतिनिधी

पुणे : शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा गंभीर प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, एका प्राचार्याला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल ₹७ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांच्या दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि सुदाम तायडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sonali Hinge

ही कारवाई बंडगार्डन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ‘दामिनी पथका’शी संबंधित असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव या प्रकरणात आल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.

काय आहे प्रकरण?

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्राचार्य यांना पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली जाईल, अशी भीती आरोपींनी दाखवली. या दबावाखाली महिलेकडून ₹७ लाखांची रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींनी आपली ओळख आणि पदाचा गैरवापर करून विश्वास संपादन केला आणि नंतर धमकावून पैसे घेतल्याचे सांगितले जात आहे.



प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी केली जात आहे.

उपनिरीक्षक अजित बडे हे सध्या सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर सोनाली हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असून, सोशल मीडियावर रील स्टार म्हणूनही ओळखली जाते. सुदाम तायडे हा त्यांचा सहकारी आहे.
या प्रकरणात पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आरोपींवर फौजदारी गुन्ह्यांनुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Reel Star Sonali Hinge, PSI Among Three Booked in ₹7 Lakh Extortion Case; Principal Blackmailed

महत्वाच्या बातम्या