भोंदू अशोक खरातचे शिझुका नॉडी नाव! रुपाली चाकणकरांचे त्यावर 177 कॉल्स असल्याचा दमानिया यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भोंदू अशोक खरातने शिझुका नॉडी नाव ठेवून लोकांना मास्क केले आहे. . रुपाली चाकणकरांचे त्यावर 177 कॉल्स आहेत. चाकणकर यांनी त्याला एवढे कॉल का केले, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केला आहे.
अशोक खरात प्रकरणात दमानिया यांनी दावा केला की, कॉल डिटेल्समध्ये रूपाली चाकणकर, दीपक केसरकर, शेलार, चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांसह अनेक लोकांचा समावेश आहे, असं समोर आलं आहे. पण त्यांना अद्याप चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.

भोंदू अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी एसआयटीने त्याच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्या माध्यमातून पथकाने भक्कम पुरावे गोळा केले असून फॉरेन्सिक टीम अहवालातील माहिती आता बाहेर येत आहे. विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, केबिनच्या आतील कडी यावरील खालच्या हाताचे ठसे मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पीडितांवर अत्याचाराचे काही अनुषंगिक पुरावेही तपास पथकाच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, खरात याची पत्नी कल्पना अजूनही फरारच आहे.

पीडित महिलांची त्याच्या केबीनमध्ये खरातसोबत झटापट झाली नसल्याची बाब अहवालात नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात जप्त केलेली औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सेनेटायझरची एक बाटली, केबीनच्या आतील कडी या महत्त्वाच्या वस्तूंवर किंवा दरवाज्यावर सापडलेले ठसे भोंदू खरातचेच असल्याचे उघड झाले आहे. या वस्तूंचा वापर करून खरात पीडितांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा आरोप आहे. पीडितांचे ठसे या वस्तूंवर आढळून आले नसले, तरी पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न खरातने केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत.

पोलिसांनी कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी वेगानं पावलं उचलण्यास सुरुवात केलीये. शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे . दहा दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले असून कल्पनाच्या माहेरी तसेच माहेरच्या तिच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, तसेच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या आणि यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली आहे.

Ashoka Kharat linked to ‘shizuka noddy’ name, Damania claims 177 calls to Rupali Chakankar

महत्वाच्या बातम्या