Sambhaji Chhatrapati : एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने संभाजीराजे छत्रपती यांची नाराजी, केंद्र सरकारला पत्र पाठवून ऐतिहासिक सत्य जपण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर :Sambhaji Chhatrapati  राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे माजी सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सविस्तर पत्र पाठवत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे देशाच्या इतिहासाच्या मांडणीमध्ये गंभीर त्रुटी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Sambhaji Chhatrapati

संभाजी छत्रपती यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, हा विषय केवळ शैक्षणिक नाही तर भारताच्या ऐतिहासिक सत्याशी आणि भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायच्या जबाबदारीशी संबंधित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचा विस्तार आणि प्रभाव हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय असून, त्याचे योग्य प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.Sambhaji Chhatrapati



नकाशा वगळण्यामागे स्पष्ट कारण नसल्याचा आरोप

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस आणि विश्वासार्ह कारण न देता काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही ठिकाणी राजपुतानातील भागांचा समावेश दाखवल्याबाबत आक्षेप घेण्यात आले असल्याचे सांगितले जाते, मात्र हे आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर टिकत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संभाजी छत्रपती यांनी नमूद केले की, १७५८ पर्यंत मराठा साम्राज्याचा प्रभाव अटक, लाहोर, मुलतान, डेरा गाझी खान आणि खैबर पख्तूनख्वा येथील जमरूदपर्यंत पोहोचला होता. हे दावे भावनिक नसून विविध ऐतिहासिक नोंदींमध्ये स्पष्टपणे नोंदवलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

तसेच, बुंदी, कोटा आणि मारवाडसारख्या राजपुत राज्यांनी मराठ्यांना चौथाई दिली होती. यावरून त्या काळातील राजकीय आणि लष्करी वास्तव स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले. ब्रिटिश नकाशाकार जेम्स रेनल आणि रॉबर्ट विल्किन्सन यांच्या नकाशांमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तृत प्रभाव दर्शवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात अनेक भारतीय आणि परदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्याच्या विस्ताराबाबत सविस्तर भाष्य केले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “History of Maharashtra: Maratha Period (Part II)” या प्रकाशनातही संबंधित नकाशे आणि पुरावे दिलेले आहेत. तसेच, राजपुताना गॅझेटियर (१८७९) मध्ये शिंदे, होळकर आणि गायकवाड यांचा प्रभाव स्पष्टपणे नोंदवलेला आहे.

मराठा साम्राज्याचा नकाशा आधी कमी करून आणि नंतर पूर्णपणे वगळल्यामुळे इतिहासाची अपूर्ण मांडणी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अशा निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या अध्यायांची संपूर्ण माहिती मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

संभाजी छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून, शैक्षणिकदृष्ट्या अचूक आणि संतुलित स्वरूपात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. हा प्रश्न केवळ प्रादेशिक अभिमानाचा नसून राष्ट्रीय ऐतिहासिक प्रामाणिकतेचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

Sambhaji Chhatrapati Expresses Discontent Over Removal of Maratha Empire Map from NCERT Textbooks, Writes to Centre Urging Preservation of Historical Truth

महत्वाच्या बातम्या