Manoj Jarange Patil : राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

विशेष प्रतिनिधी

जालना : Manoj Jarange Patil राज्य सरकारने सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन उभे करू.” असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिले आहे.Manoj Jarange Patil

मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने मराठा आंदोलकांना दिले होते. पण, अद्याप पूर्णपणे प्रत्यक्षात आले नसल्याचे समोर आल्याने मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, मराठा आरक्षण उपसमितीच्या कारभारावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली आहे.Manoj Jarange Patil



 

गृहविभागाने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये सादर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत आंदोलकांवरील अर्ध्याहून अधिक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. पण, गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमधील आंदोलकांना मात्र कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावेच लागणार आहे. सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी होत असली तरीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यास गृहविभागाने नकार दिल्याचे समोर आले आहे. यावरून, आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याची आठवण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी करून दिली. यावेळी, आकडेवारी सादर करत त्यांनी सरकारवर टीका केली.

“एकूण दाखल गुन्ह्यांपैकी 60 ते 62 गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत. सरकारने यावर सकारात्मक अहवाल देऊन ते मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायला हवी. सुमारे 80 गुन्हे अशा स्वरूपाचे आहेत, ज्याबाबत विभागीय समितीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. हा अहवाल प्राप्त होताच सरकारने हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत,” अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली. तसेच, “सरकार आणि खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी त्यांच्या शब्दापासून फिरले असले, तरी मी त्यांना बदलू देणार नाही. मी खंबीर आहे, गुन्हे कसे मागे घेतले जात नाहीत, ते मी बघतोच,” अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

“उपसमितीने केवळ दिखाव्यासाठी ‘थातूर-मातूर’ बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. ही समिती मराठ्यांच्या अंगावर मराठे घालण्यासाठी किंवा कोणाचा माज जिरवण्यासाठी नाही, तर समाजाला न्याय देण्यासाठी आहे, याचे भान अध्यक्षांनी ठेवावे.” असे म्हणत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. “सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींचे काय झाले? ESBC आणि आरोग्य विभाग या विभागातील विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या आणि प्रश्नांकडे उपसमितीचे दुर्लक्ष का? ओबीसी समाजाला ज्या योजना लागू आहेत, त्या मराठ्यांना का नाहीत? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

Biggest Protest in State So Far, Manoj Jarange Patil Warns Government

महत्वाच्या बातम्या