हडपसरमध्ये खळबळ: कर्मचाऱ्याला बांधून १२ बांगलादेशी महिलांचे पलायन!

विशेष प्रतिनिधी

पुणे: बेकायदा वास्तव्य आणि वेश्याव्यवसाय प्रकरणात ताब्यात घेतलेल्या १२ बांगलादेशी महिलांनी हडपसर येथील एका नामांकित संस्थेच्या निरीक्षण गृहातून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, तेथील महिला केअर टेकरला दोरीने बांधून ठेवून या महिला पसार झाल्या. ही घटना घडल्यानंतर तब्बल २० दिवसांनी या प्रकरणाला वाचा फुटली असून, पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.Hadapsar

नेमकी घटना काय?

हडपसरमधील ससाणे वस्ती परिसरात एका सेवाभावी संस्थेमार्फत महिलांसाठी निरीक्षण गृह चालवले जाते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर फरासखाना, दिघी, जेजुरी, देहूरोड आणि कोंढवा पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या १८ बांगलादेशी महिलांना येथे ठेवण्यात आले होते.



२३ मार्च रोजी एका महिलेने अचानक पोटदुखीचे सोंग घेतले.

मदतीसाठी आलेल्या महिला केअर टेकरला या सर्व महिलांनी मिळून घेरले. आणि केअर टेकरचे हात-पाय बांधून तिला एका जागी टाकून दिले आणि संधी मिळताच १२ महिलांनी तेथून पळ काढला. Hadapsar

न्यायालयाने दिले होते मायदेशी पाठवण्याचे आदेश!

या महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. १८ मार्च रोजी न्यायालयाने या महिलांना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याचे (Deportation) आदेश दिले होते. बांगलादेशी दूतावासाशी संपर्क साधून त्यांच्या परतीची प्रक्रिया सुरू असतानाच हा थरार घडला.

सध्याची स्थिती – सर्व महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,या घटनेमुळे निरीक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संबंधित संस्थेने यापूर्वीच पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती, असा दावा सूत्रांनी केला आहे.

पोलीस शोध सुरू
“पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. २० दिवस ही माहिती गुप्त का राहिली, याचाही तपास पोलीस करत आहेत.”

सध्या हडपसर आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात असून, या महिला पुन्हा मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या संपर्कात गेल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sensational Escape in Hadapsar: 12 Bangladeshi Women Flee After Tying Up Caretaker

महत्वाच्या बातम्या