‘ जय भीम ‘ घोषणेचे प्रणेते कोण?’ जय भीम ‘ घोषणा प्रथम कधी देण्यात आली?

विशेष प्रतिनिधी

पुणे:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि महान विचारवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशभरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी अभिवादन, मिरवणुका, व्याख्याने आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘भारतरत्न’ बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे.

“जय भीम” ही आज देशभरात सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरलेली घोषणा नेमकी कोणी दिली,याबद्दल आजही अनेक जणांना माहिती नाहीये.



१९३५ साली बाबू हरदास यांनी ‘जय भीम’ या अभिवादनाचा वापर सुरू केला. त्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक परिवर्तनाची चळवळ वेग घेत होती. या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि अनुयायांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी ‘जय भीम’ या घोषणेचा प्रभावी वापर करण्यात आला.

बाबू हरदास हे तत्कालीन मध्य प्रांत परिसरातील कामगार नेते होते. त्यांनी कामगार, वंचित आणि दुर्बल घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यासाठी मोठे योगदान दिले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला आणि ‘जय भीम’ या घोषणेला चळवळीचे अभिवादन म्हणून रूढ केले.

आजच्या घडीला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रत्येकासाठी ‘जय भीम’ ही घोषणा अभिमानाची आणि प्रेरणेची ठरली आहे. या घोषणेच्या उगमामागील बाबू हरदास यांचे योगदान समोर येत असल्याने त्यांच्या कार्यालाही नव्याने उजाळा मिळत आहे.

Who is the originator of the slogan ‘Jai Bhim’? When was the slogan ‘Jai Bhim’ first given?

 

महत्वाच्या बातम्या