नवीन गावांसाठी पुणे महापालिकेचा “मिशन ३२”प्लॅन!”शहर परिवर्तन समितीची”झाली स्थापना..

विशेष प्रतिनिधी

पुणे:वाढत्या शहरी समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून ‘ शहर परिवर्तन समिती ‘ स्थापन करण्यात आली आहे.या समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.शहरातील रस्ते,पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक कोंडी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी समिती कार्यान्वित करण्यात आली आहे.

विशेषतः पुण्यातील १२ ‘ मिसिंग लिंक ‘ रस्त्यांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.बाणेर – पाषाण लिंक रोड,वाकड ते कस्पटे वस्ती मार्ग,आंबेडकर चौक ते राजाराम ब्रीज रस्ता तसेच वर्जेमधील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर या महत्वाचा रस्त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.



दरम्यान,शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांचा फुटपाथवर अडथळा ठरणाऱ्या फीडर पिलर्सच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना पिल्लर्स डिझाईन मंजूर करून स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले.

“मिशन ३२”अंतर्गत पुण्यातील ३२ प्रमुख रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले.नव्याने समाविष्ट केलेल्या ३२ गावांमध्ये प्रत्येक गावात एक प्रमुख रस्ता विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भूसंपादन प्रक्रियेला गती

भूसंपादन प्रक्रियेचा प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.सोबतच नवीन गावातील रस्त्यांसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागांवर निविदा पूर्ण करून काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आले.

नागरिकांसाठी सहा मोबाईल एप्लीकेशन

नागरिकांच्या उत्तम सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने सहा मोबाईल एप्लीकेशन तयार केली आहेत. रस्ते व पायाभूत सुविधांशी संबंधित तक्रारी या ॲपद्वारे नोंदवण्याचे आव्हान यावेळी महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.

“मिशन ३२”मधून प्रत्येक रस्त्यासाठी महापालिका व पोलीस विभागाकडून 32 समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. नियुक्त अधिकारी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी भूमिका बजावणार आहेत.

Pune Municipal Corporation’s “Mission 32” plan for new villages! “City Transformation Committee” established..

 

महत्वाच्या बातम्या