कोचिंग सेंटरमध्ये अग्नितांडव ; १५ जणांचा होरपळून मृत्यू

विशेष प्रतिनिधी

लखनऊ :– लखनऊच्या अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोचिंग सेंटरमध्ये अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित असताना ही घटना घडली. आग इतकी भीषण होती की त्यात १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यात तीन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, याप्रकारानंतर इमारतींच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

अलीगंज भागातील उषा मेहता यामार्गावर हा प्रकार घडला.या इमारतीत अनिमेशन सेंटरसह पाळीव प्राण्याचे क्लिनिक ही होते.पाळीव प्राण्याच्या क्लिनिकमध्ये काही प्राण्यांनाही आगीची झळ बसली.आग संपूर्ण इमारतीत पसरत असल्याचे लक्षात येताच इमारतीत अडकलेल्या अनेकांनी खाली उड्या मारल्या. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. मृत्यू झालेल्या बहुतांश तरुणांचे वय २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांच्या शरीरावर कुठेही भाजलेल्या खुणा नव्हत्या. प्राथमिक तपासानुसार, आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे यासर्वांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं डॉक्टरानी स्पष्ट केला आहे.



आगीतून बचावलेल्या तरुणीने सांगितला थरारक अनुभव

या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या एका तरुणीने आगीच्या भीषण क्षणांचा अनुभव सांगितला. ती एका तारेच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली.सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती म्हणाली, “मी त्या इमारतीत काम करत होते. अचानक आग लागल्याचे समजताच सर्वत्र गोंधळ उडाला. काही क्षणांतच धूर पसरला आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले.

आम्ही मदतीसाठी अनेकांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण कोणाचाच संपर्क होत नव्हता. परिस्थिती अत्यंत भयानक झाली होती. लोक घाबरून ओरडत होते. काहीजण आगीमध्ये अडकले होते. शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने मी खिडकी फोडली आणि बाहेरील पाईपच्या साहाय्याने खाली उतरले. त्यानंतर माझा जीव वाचला.”

तिच्या या वर्णनावरून त्या क्षणी इमारतीत निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची कल्पना येते.निष्पाप तरुणांच्या अशा जाण्याने प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

Inferno at coaching center; 15 people burnt to death.

महत्वाच्या बातम्या