बदली झाल्यानंतरही ‘डील’ सुरूच; २८ लाखांच्या लाचप्रकरणाने पुणे पोलिस दल हादरले

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहर पोलिस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.शहराच्या पोलिस आयुक्तालयातच लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे.

शहरातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

पूणे पोलिस दलात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली तोटेवार यांची लोहमार्ग पोलिस मुंबई येथे बदली झाली होती.तर,तोटेवार यांना पुणे पोलिस दलातून रीतसर कार्यमुक्त देखील करण्यात आले होते.मात्र,बदली होऊन देखील आणि पदावरून कार्यमुक्त झालेल्या असताना देखील २८ लाखांची लाच स्वीकारल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एसीबीने रचला सापळा…

आर्थिक गुन्हे शाखेच्या एका प्रकरणात तपासा दरम्यान तब्बल ३० लाख रुपयांची मागणी झाली होती.खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून वैशाली तोटेवार यांनी लाच रक्कम स्वीकारली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार आणि सदर खाजगी व्यक्तीला रंगेहाथ पकडले.सध्या या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची सुरू करण्यात आली आहे.

वैशाली तोटेवार यांनी नेमकी कोणत्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी स्वीकारली होती,यासंदर्भात अजून उलगडा झालेला नाहीये.वैशाली तोटेवार याचसोबत अजून कोणी या प्रकरणात आरोप आहे का? याचा तपास एसीबीच्या पथकाकडून करण्यात येतोय.

The ‘deal’ continues even after the transfer; Pune Police force shaken by the bribery case of Rs 28 lakhs