विशेष प्रतिनिधी
काेलकत्ता : चार घरात झाडू पाेछा करण्याचे काम करून अडीच हजार रुपयांत उदरर्निवाह करणाऱ्या कल्पिता माझी या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित त्यांनी औशग्राम मतदारसंघात साडेबारा हजार मतांनी विजय मिळविला. Kalpita Majhi
संघर्ष, जिद्द आणि विश्वास यांची जिवंत कहाणी ठरलेला एक ऐतिहासिक विजय पश्चिम बंगालच्या औशग्राम मतदारसंघात पाहायला मिळाला. गुस्करा नगरपालिका क्षेत्रातील मझपुकुर पारमध्ये राहणाऱ्या कल्पिता माझी काही वर्षांपूर्वीपर्यंत घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. चार घरांत साफसफाईची कामे करून मिळणाऱ्या अवघ्या काही हजार रुपयांत त्यांनी आयुष्य उभं केलं. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नासाठी झगडत राहिल्या.
आज त्याच कल्पिता माझी यांना जनतेने १,०७,६९२ मते देत विजयी केले. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला १२,५३५ मतांनी पराभूत करत केवळ निवडणूक जिंकली नाही, तर लाखो सामान्य लोकांच्या आशांना नवी दिशा दिली.
२०२१ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यांनी हार मानली नाही. पक्षाने दाखवलेला विश्वास आणि स्वतःची मेहनत यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि पुन्हा मैदानात उतरल्या. यंदा त्यांच्या चिकाटीने इतिहास घडवला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवित ममता बॅनर्जी यांची गेल्या पंधरा वर्षांची सत्ता उखडून टाकली. भाजपने अगदी सामान्य परिस्थितीतील उमेदवारांना मैदानात उतरवून विजय साकार केला.
From domestic worker to MLA, Kalpita Majhi scripts a remarkable victory
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार