विशेष प्रतिनिधी
पुणे: टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीचे धर्मांतरण, विनयभंग आणि मानसिक छळ यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ९ जणांची चौकशी सुरू आहे.याप्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानाला अटक करण्यात आली आहे.संभाजी नगर येथील नाशिक गुन्हे शाखा आणि संभाजी नगरच्या पथकाने मिळून ही कारवाई केली.संभाजी नगर मधील नरेगाव येथील कैसर कॉलनीतील एका फ्लॅट मधून निदा खानाला ताब्यात घेण्यात आले.निदा खानाला ताब्यात घेतल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
संजय शिरसाठ म्हणाले की,’ काल संभाजीनगर मधून नाशिक पोलिसांकडून नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आले.मार्चमध्ये घटना घडल्यानंतर, निदा खान दीड ते दोन महिने कुठे गायब होती हे माहिती नाही.निदा खान संभाजी नगर अशा भागात लपली होती,ज्याठिकाणी झोपडपट्टी एरिया आहे आणि त्या ठिकाणी अमली पदार्थांचे उद्योग चालतात.निदा खान त्या ठिकाणी एकटी नव्हती,तिच्यासोबत तिची आई आणि मावशी देखील वास्तव्यास होत्या.निदा खानाला एमआयकडून सहकार्य करण्यात आले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी निदा खानला उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. धर्मांतरणासारखे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात घडतात.पुणे, संभाजीनगर सगळीकडे असे प्रकार पाहायला मिळतात. हिंदूंचा द्वेष करण्याचे प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहेत, असा आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे.
इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणी..
संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांना भेटून प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी देखील करणार आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध लागणे महत्वाचे आहे.२२ ते ३० वय वर्ष असलेल्या तरुणांना हे प्रशिक्षण दिले जाते.या तरुणांकडे नोकरी नसेल तरी आर्थिक बळ आहे.निदा खानला उघड पाठिंबा का दिला? निदा खानसाठी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली.इतर कोणत्याही शहरात न जाता निदा खान संभाजी नगर येथेच का आली? असा प्रश्न यावेळी संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला.
MIM sheltered Nida Khan; Sanjay Shirsath makes serious allegations…
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा