विशेष प्रतिनिधी
पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजीचे अध्यक्ष तथा निष्णात सीए रवी पंडित यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
केपीआयटी ही माहिती तंत्रज्ञान व शाश्वत प्रगतीला चालना देणारी एक आघाडीची भारतीय कंपनी आहे. रवी पंडित यांनी गेल्या 3 दशकांत जागतिक दर्जाचे नावीन्य व सखोल सामाजिक उद्देश यांचा संगम साधणाऱ्या संस्थांची उभारणी केली आणि त्यांचे नेतृत्व केले.
रवी पंडित केपीआयटीचे सहसंस्थापक व अध्यक्ष होते. ही कंपनी जागतिक सॉफ्टवेअर – डिफाइन्ड मोबिलिटीमधील एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करत जगभरातील 15 देशांत कार्यरत आहे. रवी पंडित यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉक्टर रवी पंडित हे कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंट्ंट्स (केपीसीए) चेही अध्यक्ष होते. केपीसीए ही 15 देशांत कार्यरत असणारी व 1200 हून अधिक तज्ज्ञांसह कार्य करणारी भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक सेवा कंपन्यांपैकी एक आहे.
रवी पंडित यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया व आगा खान रुरल सपोर्ट प्रोग्राम, इंडिया या संस्थांचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय पर्यावरण व ग्रामीण विकासाच्या प्राधान्यक्रमांवर प्रभाव टाकला. त्यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्षपदी भूषवले होते.
KPIT Technologies Chairman Ravi Pandit Passes Away
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा