पुणे मनपा निधी वाटपावरून महायुतीत कलगीतुरा: सुनेत्रा पवारांचे मुख्यमंत्र्यांना ‘समान निधी’साठी पत्र!

विशेष प्रतिनिधी

पुणे: महानगरपालिकेच्या विकास निधी वाटपावरून महायुतीमधील अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये करण्यात आलेल्या असमान निधी वाटपाबाबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी समान न्यायासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रले आहे. “विकास कामांत राजकारण नको,” असे म्हणत प्रभागांना समान निधी देण्याची मागणी केली आहे.



निधी वाटपातील तफावत आणि नाराजी

राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र सत्तेत आहेत. मात्र, पुणे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये भाजप नगरसेवकांना झुकते माप देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पदरात केवळ ३ कोटी रुपये पडले. या २ कोटींच्या फरकामुळे राष्ट्रवादीच्या गोटात तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

सुनेत्रा पवारांचा पत्राद्वारे हस्तक्षेप!
आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची बाजू सावरत सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली. आपल्या पत्रात त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी नमूद केले की, शहराचा विकास हा एकांगी असून चालणार नाही. पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन आणि रस्ते विकास यांसारख्या मूलभूत सुविधा या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नसून त्या जनतेच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे निधी वाटप करताना राजकीय भेदभाव करणे चुकीचे आहे.

मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश
सुनेत्रा पवार यांच्या या पत्राची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. महायुतीमधील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी आणि शहराच्या संतुलित विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tug-of-War in Mahayuti Over Pune PMC Fund Allocation: Sunetra Pawar Writes to CM for ‘Equal Funds’

 

महत्वाच्या बातम्या