विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tirupati केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी तिरुपती ते तिरुमला असा सुमारे ११ किलोमीटरचा पायी प्रवास करत ३८०० पायऱ्या चढून श्री बालाजीचे दर्शन घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.Tirupati
राज्यातील ‘ऑपरेशन टायगर’नंतर शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांना मतदारसंघात आणि सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले होते. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी, मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले.Tirupati
दरम्यान, संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच त्यांची ही तिरुपती वारी विशेष ठरली आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेल्या या पायी प्रवासानंतर शुक्रवारी पहाटे त्यांनी श्री बालाजीचे दर्शन घेतले.
या धार्मिक दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचे बंधूही सहभागी झाले होते. बालाजीच्या दर्शनानंतर सर्वांनी विजयवाडा येथे जाऊन कन्यका देवीचेही दर्शन घेतले.
पैलवान चंद्रहार पाटील यांनी या वारीचे काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री १० ते पहाटे २.३० या वेळेत सर्वांनी ३८०० पायऱ्या चढत सुमारे ११ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला आणि त्यानंतर श्री बालाजीचे दर्शन घेतले. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Shrikant Shinde, Omraje Nimbalkar trek 11 km to Tirupati amid cabinet buzz
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली