Ketan Agarwal murder : केतन अगरवाल हत्याकांड : सिया आणि चेतनकडून एकमेकांवरच खुनाचा कट रचल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे: Ketan Agarwal murder  गहुंजे येथील व्यावसायिक केतन अगरवाल यांच्या हत्याप्रकरणात तपासादरम्यान नवा ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य आरोपी आणि केतनची होणारी बायको सिया गोयल तसेच तिचा कथित साथीदार चेतन चौधरी यांनी पोलिस चौकशीत एकमेकांवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.Ketan Agarwal murder

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांची हत्या झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून परस्परविरोधी जबाब नोंदविण्यात आले आहेत. सिया गोयलने पोलिसांना सांगितले की, तिने केतनला लग्न मोडण्याबाबत अनेकदा सांगितले होते. मात्र, तो तयार नसल्याने चेतन चौधरीने त्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप तिने केला आहे.Ketan Agarwal murder



दुसरीकडे, चेतन चौधरीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, “केतनची हत्या करण्यासाठी सियानेच माझ्यावर दबाव टाकला,” असा दावा केला आहे.

मात्र, तपास अधिकाऱ्यांच्या मते, आतापर्यंत हाती आलेले पुरावे पाहता संपूर्ण कटाचा सूत्रधार सिया गोयल असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. दिवाळीच्या पार्टीत दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर केतनच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या संशयानुसार, 31 मे रोजी लोहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर सियाच्या मनात केतनला कड्यावरून ढकलून देण्याचा विचार प्रथम आला होता. त्यानंतर 14 जून रोजीही त्याला कड्यावरून ढकलण्याचा कथित प्रयत्न करण्यात आला. तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सियाने साप दिसल्याचा आरडाओरडा करत हा प्रकार अपघात असल्याचे भासविल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

Ketan Agarwal murder: Siya and Chetan accuse each other of plotting the killing

महत्वाच्या बातम्या