पुन्हा मला विचारायला आलात तर मार खाणार. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना परवानगी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” असे म्हणत खासदार संजय दिना पाटील यांना पत्रकारांना दमबाजी करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत ‘माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ असे विधान केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत टीका केली. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना खासदार संजय दिना पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली. ते म्हणाले “अरे भाई, बस झालं ना आता. किती अति करत आहात? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन.

इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय आणि तुम्ही असे वागताय. ता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!”



या प्रकारावर खेद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सविस्तर माहिती घेतो. पण, घडलेल्या प्रकारावर मी खासदार संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, मला पत्रकारांशी चुकीचे व्यक्तव्य करण्याची इच्छा नव्हती. माझे पत्रकारांशी चांगले संबंध आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझं कुठलाही हेतू नव्हता. संजय दिना पाटील पत्रकारांशी माफी मागण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या मनात पत्रकारांबद्दल राग नाही. संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करावी.”

एकनाथ शिंदे म्हणाले. “परंतु, जे रोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाचे विधाने करतात. आपल्या माध्यमांसमोर ते जे शब्द वापरतात, हा माध्यमांचादेखील अपमान आहे. कितीवेळा पासून ते काय काय बोलत आहेत? ते आपण पाहिले आहे. त्याचाच राग संजय दिना पाटील यांच्या मनात आहे. पत्रकारांच्या बाबतीत कोणताही राग नाही.”

“Ask me again and you’ll get beaten,” Sanjay Dina Patil warns journalists

महत्वाच्या बातम्या