विशेष प्रतिनिधी
मुंबई :-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून मयंकला आपला जीव गमवावा लागला होता . घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या .दारूच्या नशेत हा सगळा प्रकार घडल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादानंतर मयंक लोहार या तरूणाची हत्या झाली. आरोपी रोशन सुवर्णा याने वादानंतर धारदार चाकूने मयंकवर वार केले, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या हत्याकांडानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी आरोपी रोशन याला अटक केली. काल संध्याकाळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि बोरिवली जीआरपी ठाण्यात आणण्यात आलं. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोशनने चौकशीत गुन्हा कबूल करत मयंकवर का वार केले, याची धक्कादायक कबुली दिली आहे.
मयंक लोहार हा विरार परिसरात वास्तव्यास होता. तो अंधेरीच्या वेस्टसाईडमध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री तो अंधेरी येथे फर्स्ट क्लासच्या डब्यात चढला आणि विरारच्या दिशेन जात होता. त्यावेळी पाऊस येत होता म्हणून त्याने आरोपीला लोकलचा दरवाजा बंद करायला सांगितलं. याच कारणावरून मयंक आणि आरोपी रोशन सुवर्णामध्ये वाद निर्माण झाला. तो वाद टोकाला पोहोचला आणि संतापलेल्या रोशनने बॅगेतून चाकू काढून मयंकचया अंगावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा गाडीतच मृत्यू झाला.यानंतर लोकल बोरिवलीला थांबताच आरोपी ट्रेनमधून उतरून पसार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तात्काळ ताब्यात घेऊन तपास यंत्रणेद्वारे मयंकचा शोध सुरू केला. अखेर त्याला काल संध्याकाळी अटक करण्यात आली.
आरोपीने मयंकला का मारलं ?
पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णा याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. मयंकला का मारलं हेही त्याने सांगितंल. आरोपीच्या सांगण्यानुसार, घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. त्या दिवशी त्याने बरीच दारू प्यायली होती. त्याच नशेत तो अंधेरीहून ट्रेन पकडून घरी जात होता. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकलच्या डब्यातही पाणी आत येत होतं. त्यामुळे ट्रेनचा दरवाज बंद करण्याच्या मुद्यावरून आरोपी रोशन आणि मयंक यांचा वाद सुरू झाला.त्यांच्या वादाचे रुपांतर भांडणात झालं. रोशनच्या सांगण्यानुसार, रागाच्या भरात मयंकने त्याला ठोसा मारला, इतर प्रवाशांनीही मयंकची बाजू घेऊन मला मारहाण केली, असा दावा रोशनने केला. दारूमुळे आधीच चढलेली नशा आणि ट्रेनमधील लोकांमसोर झालेली मारहाण यामुळे रोशन प्रचंड संतापला, त्याचा ताबा सुटला आणि संतापाच्या भरात त्याने बॅगेत हात टाकून धारदार चाकू बाहेर काढला. मयंकच्या छातीवर आणि पोटावर वार करण्यात आले.सगळीकडे रक्ताचा सडा पसरला होता. मयंक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि नंतर त्याचा ट्रेनमध्येच मृत्यू झाल्याचं आरोपीकडून स्पष्ट केले आहे.
Why was Mayank attacked on the local train? Even the police were baffled by the revelation made by the accused, Roshan!
महत्वाच्या बातम्या