विशेष प्रतिनिधी
धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विकासासाठी आपण पक्षांतर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला त्यांचे चुलत बंधू मकरंदराजे यांनी तीव्र विराेध केला आहे. पक्षाने आदेश दिल्यास त्यांच्यासमाेर उभे ठाकण्याचा इशाराही दिला आहे. Omraje Nimbalkar
ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी ओमराजेंच्या पक्षांतराच्या निर्णयाला विराेध करत ठाकरे गटासोबतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे .मकरंदराजे म्हणाले, ओमराजे निंबाळकर गेल्या महिनाभरापासून बंडखोरीच्या प्लॅनिंगमध्ये होते. पक्षांतराबाबत चर्चा झाली होती पण मला तो निर्णय मान्य नव्हता. महिनाभरापूर्वी ओमराजेंनी माझ्यासोबत पक्षांतराबाबत चर्चा केली होती. पण मला त्यांचा निर्णय पटला नाही.
त्यांनी त्यांचा निर्यण घेतला. मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.२०२९ लाही आपण सहजपणे निवडून येऊ, असंही त्यांनी सांगितलं पण त्यांनी ऐकले नाही.व्यवस्थेला जाब विचारून काम करून घेणे ही शिवसेनेकडून अपेक्षा असते, यापुढेही तसंच काम होईल. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर मी ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरायला तयार आहे.
दरम्यान, एका बाजुला घरातून विराेध हाेत असताना कट्टर दुश्मनी असणाऱ्या पद्मसिंह पाटील व राणा जगजितसिंह यांच्याकडून मात्र ओमराजे यांचे स्वागत झाले आहे. राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत मतदार भावनिक झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता जर ओमराजे निंबाळकर विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सहभागी होत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर व पद्मसिंह पाटील हे मावसभाऊ हाेते. पवनराजे यांचा २००४ मध्ये खून झाला. या खुनाच्या खटल्यातून पद्मसिंह पाटील यांची नुकतीच निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे.
Omraje Nimbalkar’s Defection Faces Family Opposition
महत्वाच्या बातम्या