केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली

विशेष प्रतिनिधी

पुणे : केतनला टक्कल हाेते. ताे विग घालायचा. म्हणून त्याच्याबराेबर लग्न करायचे नव्हते असे सिया गाेयल हिने पाेलीसांना सांगितले असल्याची माहिती समाेर आली आहे. साखरपुड्यानंतर आपल्याला हे समजल्याचा दावाही तिने केला आहे. Siya admits

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन गाेष्टी समाेर येत आहेत. साखरपुड्याच्या समारंभात अगदी प्रेमाने केतनसाेबत शुटींग करणारी सिया अचानक कशी बदलली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, सियाने याचे उत्तर त्यांला असलेले टक्कल दिले आहे.



केतन अगरवालला टक्कल होते की नाही, याविषयी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतु सियाने पोलीस चौकशीत केलेल्या दाव्यानुसार तो विग वापरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. टकलामुळे त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, असं सिया म्हणाली. पोलीस तपासात सिया सतत नवनवीन दावे करत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सर्व गोष्टी साखरपुडा होण्याच्या अगोदर सिया आणि गोयल कुटुंबाला सांगितल्या होत्या. सियाला विग आवडत नव्हता तर हत्या कशाला करायची, नकार द्यायचा होता.

Siya admits she did not want to marry Ketan because he was bald: Police

महत्वाच्या बातम्या