Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात सलग दुसऱ्या दिवशी फेरबदल; 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Police महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी भारतीय पोलीस सेवेतील 53 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले असून, याद्वारे राज्य पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल केले होते. यानंतर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा राज्य पोलीस दलात फेरबदल करण्यात आले असून सात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.Maharashtra Police

शुक्रवारी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांनंतर गृह विभागाने आज आणखी एक बदली आदेश जारी केला आहे. या आदेशाद्वारे भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा मधील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदांवरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तथापि, सरकारने या अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्तींबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, या सर्व अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या नंतरच्या टप्प्यावर स्वतंत्रपणे सोपवण्यात येतील.Maharashtra Police



बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि मुंबई सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या यादीत मुंबई एटीएसच्या पोलीस अधीक्षक शीला सैल; पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलीस महानिरीक्षक प्रकाश जाधव, मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांचाही समावेश आहे. तसेच जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले अशोक बनकर यांचाही या यादीत समावेश आहे.

Major reshuffle in Maharashtra Police; 7 senior officers transferred

महत्वाच्या बातम्या