Sushma Andhare : लाडकी बहिणी योजनेतून 80 लाख महिलांना वगळल्याचा आरोप; सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sushma Andhare  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून गेल्या एका महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Sushma Andhare

अंधारे यांनी आरोप केला की, निवडणुका संपल्यानंतर सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. योजनेच्या सुरुवातीला केवायसी किंवा उत्पन्नाचे कठोर निकष नव्हते. त्यामुळे अनेक अपात्र व्यक्तींनी, अगदी काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा त्यांनी केला. आता लाखो महिलांचे लाभ बंद करण्यात येत असताना याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. Sushma Andhare



त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधत महिलांच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याऐवजी त्या केवळ योजनेचे अपडेट देण्यापुरत्याच मर्यादित असल्याची टीका केली. तसेच अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील इतर वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकरणावर उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

विधानपरिषद निवडणुकीवर टीका

विधानपरिषदेच्या निवडणुकांवर बोलताना अंधारे म्हणाल्या की, सध्या ही निवडणूक नसून “भाऊ पुनर्वसन योजना” आणि “बहीण पुनर्वसन योजना” सुरू आहे. काही नेते आपल्या मुला-मुलींना राजकीय संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

पुण्यातील विषारी दारूकांडावरूनही अंधारे यांनी प्रशासनावर टीका केली. हातभट्टी दारूविरोधातील कारवाई केवळ काही दिवसांची दिखाऊ मोहीम असल्याचा आरोप करत त्यांनी भिमनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि लमाण तांडा परिसरातील अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद होणार का, असा सवाल उपस्थित केला.

अवैध दारू निर्मिती केंद्रे पुन्हा सुरू होणार नाहीत याची हमी कोण देणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी गृहखात्याच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

80 Lakh Women Dropped from Ladki Bahin Scheme? Sushma Andhare Launches Attack on Maharashtra Government

महत्वाच्या बातम्या