Parvati Home : पर्वती गावात गुंडाने घरात घुसून ज्येष्ठ महिलेचा गळा आवळला, सोन्याचे दागिने लुटले

विशेष प्रतिनिधी

पुणे : Parvati Home स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माथेफिरू आणि सराईत गुन्हेगाराने भरदिवसा उच्छाद मांडल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्वतीगावातील एका सोसायटीमध्ये घरात घुसून एका वृद्ध महिलेचा गळा दाबून सोन्याचे दागिने लुटल्यानंतर, आरोपीने सोसायटीच्या कार्यालयात घुसून एका महिलेचा विनयभंग करत तिच्या डोक्यात काच मारून तिला जखमी केले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपीविरुद्ध जबरी चोरी, विनयभंग, तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा थरार शनिवार, दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी दुपारी १३:१० वाजण्याच्या सुमारास घडला.Parvati Home

ललित सुनील परदेशी (रा. जनता वसाहत, पर्वती) असे आरोपीचे नाव आहे. अरविंद बाळकृष्ण सावंत (वय ६०रा. पर्वतीगाव) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार विश्वनाथ वैभव सोसायटीमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद सावंत यांच्या घरी त्यांची वृद्ध आई एकटी असताना आरोपी ललित परदेशी याने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्याने वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याचा प्रयत्न केला. आईने त्याला धाडसाने विरोध केला असता, आरोपीने तिचा गळा दाबून तिला जोरात ढकलून दिले, ज्यामध्ये तिच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. आरोपीने तिच्या चैनमधील ६ ते ७ सोन्याचे मणी जबरदस्तीने तोडून हिसकावून घेतले.Parvati Home



घरातून पळून जात असताना आरोपीने विश्वनाथ वैभव सोसायटीच्या कार्यालयात काम करणाऱ्या शीतल ब्रिजेश मेहेर या महिलेचा पाठलाग केला. तिला अश्लील भाषेत बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली. भयभीत होऊन महिला ऑफिसमध्ये गेली असता आरोपीने ऑफिसमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली. त्याने ऑफिसची काच तोडून ती थेट शीतल यांच्या डोक्यात मारली, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

सोसायटीत आरडाओरडा आणि तोडफोडीचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि रहिवासी मोठ्या संख्येने जमा झाले. नागरिकांना पाहून आरोपी ललित परदेशी याने आरडाओरडा करत धमकावण्यास सुरुवात केली. “मी येथील भाई आहे, माझ्याविरुद्ध जर कोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तर एकेकाला जिवंत सोडणार नाही, पाहून घेईल,” अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत निर्माण केली आणि तो तेथून पसार झाला. भरदिवसा झालेल्या या गंभीर प्रकारामुळे पर्वतीगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसाठ करीत आहेत.

Goon Strangles Elderly Woman, Loots Gold After Breaking Into Parvati Home

महत्वाच्या बातम्या