विशेष प्रतिनिधी
पुणे : Sky Spa स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली आहे. जगताप चौकाजवळील परमार गॅलरी येथील ‘स्काय स्पा’वर पोलिसांनी अचानक छापा टाकून तिथे बेकायदेशीरपणे सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला आहे. पैशांचे आमिष दाखवून मुलींना देहविक्रीच्या दलदलीत ढकलणाऱ्या आणि त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका भागवणाऱ्या एका ३३ वर्षीय परप्रांतीय महिला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवार, दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी दुपारी करण्यात आली.Sky Spa
रुबीका ऊर्फ लालरेम्पपुई थाँगलियाना (वय ३३, रा. सी-११ हिलमेन, आयजॉल, मिझोराम राज्य; सध्या रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप आनंदा साळवे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (मानवी तस्करी) व ३(५) (समान हेतूने संगणमताने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Sky Spa
पोलिसांना परमार पार्क रोडवरील ‘स्काय स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे उकळून अनधिकृतपणे कुंटणखाना चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून तेथे खात्री केली. कुंटणखाना सुरू असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी पथकासह स्पावर धाड टाकली.
तपासात उघड झाले की, आरोपी महिला रुबीका ही मिझोराममधील असून ती सध्या कोंढव्यात राहत होती. तिने इतर साथीदारांशी संगणमत करून बाहेरून मुली आणून स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ती स्वतः ठेवून घेत असे आणि त्यावरच आपली उपजीविका चालवत होती.
Sky Spa raided, prostitution racket busted
महत्वाच्या बातम्या