तब्बल २३ वर्षांनंतर घेतला वडिलांच्या हत्येचा बदला !

विशेष प्रतिनिधी

पुणे :- पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी मिजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली.Avenged

२३ वर्षांनंतर वडिलांच्या हत्येचा बदला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर मयत संजय देशमुख यांच्यावर तब्बल २८ वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले. यामध्ये मुख्य आरोपी मंथन वैद्य (वय २५) आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येचा राग मनात ठेऊन हा बदला जवळपास २३ वर्षांनंतर घेतला. त्यातूनच त्याने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने वडिलांच्या हत्येचा बदला Avenged घेतला.

२००३ मधील हत्येची पार्श्वभूमी

गुन्ह्याचे मूळ कारण शोधले असता, मुख्य आरोपी मंथन वैद्य हा दीड वर्षाचा असताना, २००३ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या वडिलांचा खून झाला होता. त्या खुनाच्या प्रकरणात संजय देशमुख हा आरोपी साडेतीन वर्षे जेलमध्ये राहिला होता. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. संजय देशमुख हा सराईत गुन्हेगार होता. वडिलांच्या हत्येतील आरोपीला शिक्षा झाली नाही, याच रागातून मंथन वैद्य याने साथीदारांच्या मदतीने हा कट रचून संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येमागे आणखी काही कारण आहे का याचा तपास राजगड पोलीस करत आहेत.


  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन

नेमकं प्रकरण काय ?

११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, मंथन वैद्यच्या वडिलांचा खून संजय देशमुख यांनी केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.

Avenged father’s murder after a full 23 years!

महत्वाच्या बातम्या