विशेष प्रतिनिधी
पुणे: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा सन्मान प्रदान केला जाईल. १ लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
दरम्यान या सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.
टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आदी नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे.
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे अजित डोवाल यांनी ३३ वर्षांहून अधिक काळ गुप्तचर विभागात (IB) निष्ठापूर्वक सेवा बजावली आहे. शांतता काळात दिला जाणारा लष्करी सन्मान ‘कीर्ती चक्र’ प्राप्त करणारे ते पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत.
डोवाल यांनी आपल्या कार्यकर्दीत अनेक कामगिरी आणि ऑपरेशन्स यशस्वी केले. यामध्ये
ऑपरेशन ब्लॅक थंडर-२ सुवर्ण मंदिरात पार पडलेल्या या कारवाईतील अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना ‘कीर्ती चक्र’ मिळाले.
ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन हॉट परसूट’, ‘बालाकोट एअर स्ट्राइक’ आणि ‘डोकलाम सीमावाद’ यांसारख्या गंभीर प्रसंगी मुत्सद्देगिरी व रणनीतीचे नेतृत्व डोवाल यांनी केलं आहे.
पूर्वी काँग्रेस विचारसरणीशी निगडित असलेल्या टिळक कुटुंबाच्या विश्वस्त संस्थेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक काँग्रेसपासून दुरावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
National Security Advisor Ajit Doval Announced as the Recipient of This Year’s ‘Lokmanya Tilak National Award’!
To be Honored at the Hands of Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा