उद्धव ठाकरे कधीही जमिनीवर आले नाहीत, आता काय येणार? डॉ. श्रीकांत शिंदे यांचा निशाणा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आजपर्यंत कधीही जमिनीवर आले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?” असा सवाल करत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिंदे म्हणाले, संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे १३ खासदार महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडतील.



सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, ते गेल्या २० दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने कोणताही अनर्थ घडू नये, या उद्देशाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.

केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारच्या काळात पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विविध घोटाळ्यांच्या घटना घडल्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ ते २०२६ या १२ वर्षांच्या काळात देशाने अभूतपूर्व विकास केला असून, या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही कलंक नसल्याचा दावा त्यांनी केला.

मतदारसंघ पुनर्रचना आणि संबंधित विधेयकावर बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, भविष्यात परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. तसेच डीएमके आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांच्या मतांनाही सरकार ऐकून घेईल. आवश्यक वाटल्यास योग्य बदल करण्याची तयारी सरकारने आधीच दर्शवली असून, विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता देशहिताचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Shrikant Shinde Takes Dig at Uddhav Thackeray: ‘He Was Never Grounded, What Can We Expect Now?’

महत्वाच्या बातम्या