महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; योगेश कदम यांनी तटकरेंना डिवचलं

विशेष प्रतिनिधी

मुंबई :- महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत वाद आता टोकाच्या वळणावर पोहचला आहे. आता रामदास कदम यांचे सुपुत्र आणि मंत्री योगेश कदम यांनी शरद पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईज साठी जागा राहिली नाही, आता हे मिटेल असं मला वाटत नाही,” असा स्पष्ट इशारा देत योगेश कदमांनी महायुतीतील संघर्षाची धार अधिक तीव्र केली आहे.Yogesh Kadam

काय म्हणाले योगेश कदम?

तटकरे यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेनंतर योगेश कदम चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. योगेश कदम म्हणाले, “सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानंतर कुठेही कॉम्प्रमाईजसाठी जागा राहिली नाही. आता हे मिटेल असं मला वाटत नाही. आणि मला खोलात पडायचं नाही.” याचवेळी त्यांनी मागील निवडणुकांचा उल्लेख करत विधान केले. “मागच्या विधानसभेला आणि लोकसभेला कोणी कोणाला मदत केली हे समोर आलं तर पितळ उघडे पडेल,” असे योगेश कदम म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



नेमका वाद काय?

यापूर्वी रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी तटकरेंवर Tatkare टीका केली होती. ते म्हणाले होते की, “सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे.”

या टीकेला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनीही रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. पिसाळलेला श्वान चावला की माणूस त्या श्वानाप्रमाणे बोलतो अशी टीका तटकरेंनी रामदास कदम यांच्यावर केली. एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावे असे म्हणत सुनील तटकरे Tatkare यांच्या कडून कदम यांना मनोरुग्णाची उपमा देण्यात आली. आधीच मर्कट त्यात दारु प्यायले असे म्हणत तटकरे यांच्याकडून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर पलटवार करण्यात आला.

Internal rift within the Mahayuti spills out into the open; Yogesh Kadam takes a dig at Tatkare.

महत्वाच्या बातम्या