विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदाेलन सुरू आहे. मात्र, यामध्ये माेठ्या संख्येने डिलिव्हरी बॉईज, ट्रक ड्रायव्हर आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर सहभागी झाल्याने आंदाेलन पेटविण्यासाठी भाडाेत्री आंदाेलक आणल्याचा कट रचला गेल्याचा संशय पाेलीसांनी व्यक्त केला आहे.
नीट परीक्षा आणि पेपर लीक प्रकरणाविरोधात काढण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मोर्चात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांऐवजी डिलिव्हरी बॉईज, ट्रक ड्रायव्हर्स आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारने या ‘संशयित गर्दी’ची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या लोकांना विशिष्ट उद्देशाने किंवा मानधनावर दिल्लीत आणले गेले होते का, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
रेल्वे व वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, गर्दीतील मोठा भाग हा पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आला होता.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि प्रसारमाध्यमांच्या संवादात सहभागी लोकांकडून चित्र स्पष्ट झाले आहे. झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा एक जण आंदोलनात सहभागी होता. “धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असे त्याने सांगितले. इरफान हा एका कंपनीत हेल्पर असून गुरुग्रामहून आंदोलनात पोहोचला होता, मात्र नीट आंदोलनात येण्यामागचे कोणतेही ठोस कारण त्याला सांगता आले नाही. तर लुधियानाहून आलेला गुरविंदर व्यवसायाने ट्रक चालक आहे. या आंदोलनात विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतू ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही ते लोकही आंदोलनात घुसल्याचा संशय तपास यंत्रणांना आला आहे.
दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा संपूर्ण घटनेचा ‘पॅटर्न आणि कॉन्स्पिरसी’ अँगलने तपास करत आहेत. सीसीटीव्ही आणि ड्रोन फुटेजच्या मदतीने सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर आणि हिंसक चकमकीत सहभागी असलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Paid protesters mobilised for Delhi stir? Delivery workers, truck drivers among participants
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका