वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत, मनाेज जरांगे यांचा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना शब्द

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काहीही झालं तरी जंतरमंतरवरील जागा सोडू नका, वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील,” असा विश्वास मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिल. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला ‘उलटं करण्याची’ ताकद आपल्यात असून, पुन्हा हल्ला झाल्यास नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला .

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मनाेज जरांगे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली . आंदोलन शांततेच्या मार्गानेच करा आणि काहीही झालं तरी ही जागा सोडू नका. आवश्यकता पडल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही देताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी फक्त एक हाक मारावी, आम्ही अत्यंत मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होऊ. वेळ पडली तर सर्व मराठे दिल्लीत येतील आणि हे सरकार उलटवून लावण्याची ताकदही आमच्यात आहे.”

विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत जरांगे म्हणाले, “सध्याचे सरकार हे विद्यार्थ्यांचे मुडदे पाडण्याचे काम करत आहे. आज संपूर्ण देश आणि राज्य या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जर विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केला किंवा त्यांच्यावर हात उचलला, तर या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.



जरांगे पाटील म्हणाले, “आतापर्यंत दिल्लीतील आंदोलन अतिशय शांततेत सुरू होते. परंतु सरकारने अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला लावला. सरकार इतक्या क्रूरपणे वागू शकते, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. मुलांचे पाय तुटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. जर हे सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य पाहू शकत नसेल, तर त्यांची मस्ती उतरवावीच लागेल .

विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. “देशातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हे सरकार जर लोकशाही मार्गाने जगू देणार नसेल, तर अशा सरकारचा माज उतरवणे गरजेचे आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा लोकच या सत्तेची मस्ती उतरवतील,” असा दावा त्यांनी केला.

All Marathas will reach Delhi if needed’: Manoj Jarange backs students at Jantar Mantar

महत्वाच्या बातम्या