Ketan Agrawal Case : केतनला मारण्याचा नाही तर सीयाचा ‘हा’ होता प्लॅन, धक्कादायक माहिती समोर !

विशेष प्रतिनिधी

पुणे :Pune केतन अग्रवाल हत्या प्रकरणात (Ketan Agrawal Case ) केतनला मारण्याचा नाही पण गंभीर जखमी करायचा पहिला प्लॅन होता, अशी माहिती समोर आली आहे. केतनला जखमी करण्यासाठी कुणाला सुपारी द्यायची, याबद्दल सिया आणि चेतनमध्ये बातचीत झाली होती. केतनला मारहाण करणे किंवा त्याचा अपघात घडवून आणण्यासाठी दोन्ही आरोपींनी चर्चा केल्याची माहिती देखील समोर आली आहे.



त्याचबरोबर अपघात घडवून आणून जखमी करण्यासाठी किंवा त्याला लुटण्यासाठी कुठली लोकं हे काम करू शकतील, याबद्दल सुद्धा सिया आणि चेतनने चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आपल्यावर संशय येणार नाही म्हणून अपघात, लुटणे आणि मारहाण अशा पर्यायांवर झालं दोन्ही आरोपींमध्ये चर्चा झाली होती. विवाहपूर्वी बाली मध्ये होणाऱ्या प्री-वेडिंग रद्द व्हावे यासाठी देखील खटाटोप केला होता. Ketan Agrawal Case

राज्यासह संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहे. एकीकडे या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. तर दुसरीकडे धक्कादायक खुलासे होत आहेत. केतनला मारण्याचा नाही पण गंभीर जखमी करायचा पहिला प्लॅन होता, अशी माहिती समोर आली आहे. केतनला जखमी करण्यासाठी कोणाला सुपारी द्यायची याबद्दल सिया आणि चेतनमध्ये बातचीत झाली होती. केतनला मारहाण करणे किंवा त्याचा अपघात घडवून आणण्यासाठी दोन्ही आरोपींनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Ketan Agrawal Case : Siya’s plan wasn’t to kill Ketan—shocking details revealed.

महत्वाच्या बातम्या