Rahul Gandhi : राहुल गांधींनी चर्चेनंतर अचानक बदलली मागणी, जितेंद्र सिंहांचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Rahul Gandhi  नीट परीक्षा व कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी वारंवार मागण्या बदलल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे.Rahul Gandhi

जितेंद्र सिंह यांनी दावा केला की, सरकारने राहुल गांधींची सुरुवातीची मागणी मान्य करून संसदेत नीट व परीक्षा गैरव्यवहारांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी अट घातली.Rahul Gandhi



आंदोलन सुरू झाल्यानंतर सुमारे तासाभराने जितेंद्र सिंह आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहनही होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असल्याने सरकारने त्यांना चर्चेसाठी पाठविल्याचे सिंह यांनी सांगितले.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी नीट वाद, कथित पेपरफुटी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत चर्चा घेण्याचे आश्वासन मिळाल्यास आंदोलन मागे घेऊ, असे सुरुवातीला सांगितले होते.

यानंतर जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून संसदेत या विषयावर चर्चा करण्यास मान्यता मिळवल्याचा दावा केला. मात्र, ही माहिती राहुल गांधींना दिल्यानंतर त्यांनी आंदोलन संपविण्याऐवजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

“काही मिनिटांपूर्वी संसदेत चर्चा हीच त्यांची एकमेव मागणी होती. सरकारने ती मान्य केल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची नवी अट घातली,” असा आरोप सिंह यांनी केला.

आपल्या मागण्या बदलणे हा आपला अधिकार असल्याचे राहुल गांधींनी सांगितल्याचा दावाही केंद्रीय मंत्र्यांनी केला. तसेच, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील परिसर धरणे आंदोलनासाठी योग्य नसल्याचे गृहसचिवांनी सांगितल्यानंतर, कुठे बसायचे हा देखील आपला अधिकार असल्याचे राहुल गांधी म्हणाल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे सांगत आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याची भूमिका कायम ठेवली. या आरोपांमुळे नीट आंदोलनावरून काँग्रेस आणि केंद्र सरकारमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

Rahul Gandhi Suddenly Changes Demand After Talks, Alleges Jitendra Singh

महत्वाच्या बातम्या