विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘मिशन ९५ दिवस’ अंतर्गत अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली निवासी इमारत पूर्ण करत अभियांत्रिकी क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मोशी, सेक्टर-१२ येथे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे. PMRDA
या प्रकल्पात वेग, गुणवत्ता आणि अचूक नियोजन यांचा संगम साधण्यात आला आहे. अत्याधुनिक 3-S प्रीफॅब तंत्रज्ञानाचा वापर, झिरो लॅग शेड्युलिंग, पूर्वनियोजित बांधकाम प्रक्रिया आणि दिवस-रात्र तीन शिफ्टमध्ये सुरू असलेल्या अखंड कामामुळे हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकला.
सुमारे ९४,७०० चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेल्या या इमारतीत ११२ परवडणाऱ्या २ बीएचके सदनिका तयार करण्यात आल्या आहेत. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वेगवान आणि परवडणारे गृहनिर्माण हे मोठे आव्हान बनले असताना, पीएमआरडीएचा हा प्रकल्प भविष्यातील गृहनिर्माणासाठी ‘स्केलेबल मॉडेल’ ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वेळ, खर्च आणि मनुष्यबळाचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करता येते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे. या उपक्रमामुळे ‘सर्वांसाठी घर’ या शासनाच्या उद्दिष्टाला चालना मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नवतंत्रज्ञानाचा संगम साधत पीएमआरडीएने विकासाचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
14 Floors in 95 Days! PMRDA’s Engineering Record Enters Asia Book of Records
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..