विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्य सरकारकडून महत्वाच्या नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.नवीन सुधारित आराखड्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.सुधारित आराखड्यामुळे प्रकल्पाची लांबी,खर्च आणि व्याप्ती देखील वाढली वाढली आहे.राज्यातील प्रवाशांच्या सुविधांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. Shaktipeeth Marg
सुधारित आराखड्यानुसार नांदेड,हिंगोली,धाराशिव, परभणी,सोलापूर,सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीत बदल करण्यात आला असून,सातारा जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे.सुधारित आराखड्यानुसार महामार्गाची लांबी 54 किलोमीटर वाढेल तर मार्गबदल आणि जिल्ह्याचा समावेशामुळे 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे.
या तालुक्यांचा होणार समावेश
हदगाव,कळमनुरी,वसमत,परभणी,औंढा नागनाथ,पंढरपूर, बार्शी,माढा,माळशिरस, माण खटाव,कडेगांव, पलूस, इस्लामपूर,करवीर,पन्हाळा राधानगरी आणि भुदरगड.
नेमका बदल कशामुळे?
शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास केलेल्या तीव्र विरोधामुळे जवळपास 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोव्याच्या सेमी पर्यंत होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.नवीन आणि सुधारित आराखड्यानुसार हा मार्ग राज्यातील 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यामधून जवळपास 21 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.शक्तिपीठ महामार्गामुळे साध्या 18 तासांचा नागपूर ते गोवा हा प्रवास 8 तासांवर येणार आहे.
सुधारित आराखड्यानुसार महामार्ग असा असणार
नवीन पर्यायांचा विचार करून महामार्गाच्या प्रकल्पात महत्वाचे बदल करत शक्तिपीठ महामार्गाची नव्याने आखणी करण्यात आली आहे.सुधारित प्रकल्पाला राज्य सरकारकडून बुधवारी मान्यता देण्यात आली आहे.सुधारित आणि नवीन आराखड्यानुसार वर्धा,यवतमाळ,बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून,नांदेड,परभणी,धाराशिव,बीड,सोलापूर,सांगली,कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आले असून,सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.सुधारित आराखड्यानुसार 865.765 किलोमीटर आहे.
धार्मिक स्थळांची होणार जोडणी
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तिपीठे आणि धार्मिक केंद्र कमी अंतरावर जोडली जाणार आहेत.नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका माता मंदिर,औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग,आंबेजोगाई,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी आणि ज्योतिबा या धार्मिक स्थळांची जोडणी होणार आहे.
Approved revised plan of Shaktipeeth Marg; Satara district newly included.
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर